संपूर्ण स्वीकार!!
आहे तस पूर्णपणे स्वीकारण्याची कला तूम्ही शिका. निसर्गाची सत्यता माना त्याच्या विरुद्ध जाण्याची कल्पना ही करू नका. आता जे आहे, त्याच्या विरुद्ध जाऊनका. फ़क्त नदीच्या प्रवाह बरोबर रहा.
दोन भटके प्रवासी झाडाखाली बसले असताना एक विचारतो, "जिम तुला माहिती आहे ... हा फिरतिचा व्यवसाय आयुष्यभर करत रहाणे, इकडे तिकडे भटकने, कोणालाही आपण नको असणे, तिरस्कार यूक्त नजरा, नको नको वाटते सग़ळ......."
जिम म्हणतो, "मग तू दुसरे काम का नही बघत?"
"काय दुसरे काम, आणि काय सांगू जगाला की मी पराभूत आहे म्हणुन..."
स्वताला कधीही पराभूत समजू नका. आहे तस स्वीकारणे यात फार मोठे यश लपलेले आहे. तुम्ही पराभूत होणारच नाही. या वृत्तिमुळे जगातली कोणतीही शक्ति तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. कारण पराभवाच्या छायेत पण तुम्ही आनंदाने नाचता . येणारी प्रत्येक संधि सुंदर निर्मितीत उपयोगात आणा.
जे काही घडते ते चांगलेच आहे........असे समजुन सहज पणाने घ्या . हे सुद्धा कायम राहणार नाहीये, तर बदलत जाणार आहे.
(सन्दर्भ : नवी पहाट)

