मंगळवार, १६ जून, २००९

आपले मन

आपले मन हे अतिशय भित्रे असते. मन हे कधीच धाडसी नसत, तर ते कायम सावध असत. प्रत्येक पाउटाकताना, इथे काही धोका नाही, हे दुसरयाने आजमाउन पहिल्या शिवाय किंवा ती खात्री पटेपर्यंत ते प्रत्येक वेळी विचार पूर्वक आणि सावधपणे प्रत्येक पायरी ओलांडत असते. म्हणून वाढ होताना मन हे नेहमी अडचणीचे ठरत असते.

प्रत्येक गोष्ट आनंदात चाललेली असते आणि मन मधेच ताकीद देते की 'लक्ष दे, तिकडे ध्यान दे.' जेव्हा आपण त्याचे ऐकतो तेव्हा भीती निर्माण होते. अशा वेळी संयम ठेउन मनावर अधिकार गाजवा .

शुक्रवार, १२ जून, २००९

आत्मसन्मान आणि स्वाभिमान


आत्मसन्मान आणि गर्व यात तस काहीही फरक नाही.फरक आहे तो अंहकार आणि आत्मसन्मान किंवा स्वाभिमान यामधे. आत्मसन्मान आणि स्वाभिमान या दोन्ही तुमच्या व्यक्तिमात्वाच्या सहज गोष्टी आहेत. तो तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही तुम्हाला ओळखल्याची ती खुण आहे.


पण अंहकार म्हणाला की तुलना आली.आत्मसन्मान आणि अभिमान यामधे तुलनेचा प्रश्नच कुठे असतो. आणि हाच मुळ फरक आहे अंहकार आणि आत्मसन्मान यात.


अहंकारात तुम्ही सतत दुसरयाशी तुलना करत राहता. तुम्ही दुसरया पेक्षा किती चांगले आहात , किती श्रेष्ठ आहात , किती उंचावर आहात , किती धार्मिक आहात , किती पवित्र आहात , हे अट्टाहासाने दाखवत दाखवत तुम्ही तुलना करत असता. तुम्ही मात्र संत आणि इतर मात्र पापी असेच तुम्ही समजता. कारण काही का असेना , तुम्ही सतत तुलना करत राहता की , तुम्ही किती वरच्या दर्जाचे आणि इतर किती खालच्या दर्जाचे? हीच ती अहंकाराची मुहूर्त मेढ !!

पण अभिमान कधीही दुसरयाशी तुलना करीत नाही. असे लोक कधीही कुणाबद्दल काही बोलत नाहीत.ते फक्त म्हणतात , " मला माझा अभिमान आहे." मी जसा आहे त्याचा मला अभिमान आहे. ते कुणा दुसरयाबद्दल बोलत नाहीत . पण ज्या क्षणी तुम्ही तुलना करू लागता तेव्हा तिथेच एक भयानक खेळाला सुरुवात होते.

पण स्वत: बद्दल अभिमानाची भावना बाळगणे यात दुसरया कोणाला कमी लेखणे होत नसते . उलट स्वत वरुन , इतराना तुम्ही अभिमान कसा बाळगावा हे दाखउ शकता.म्हणुन मी अहंकराच्या विरुद्ध आहे , आत्मसन्मान आणि स्वाभिमान यांच्या विरुद्ध नाही. हेच तर माणसाचे महत्वाचे गुण आहेत ।

(सन्दर्भ : नवी पहाट)