मंगळवार, १६ जून, २००९

आपले मन

आपले मन हे अतिशय भित्रे असते. मन हे कधीच धाडसी नसत, तर ते कायम सावध असत. प्रत्येक पाउटाकताना, इथे काही धोका नाही, हे दुसरयाने आजमाउन पहिल्या शिवाय किंवा ती खात्री पटेपर्यंत ते प्रत्येक वेळी विचार पूर्वक आणि सावधपणे प्रत्येक पायरी ओलांडत असते. म्हणून वाढ होताना मन हे नेहमी अडचणीचे ठरत असते.

प्रत्येक गोष्ट आनंदात चाललेली असते आणि मन मधेच ताकीद देते की 'लक्ष दे, तिकडे ध्यान दे.' जेव्हा आपण त्याचे ऐकतो तेव्हा भीती निर्माण होते. अशा वेळी संयम ठेउन मनावर अधिकार गाजवा .

शुक्रवार, १२ जून, २००९

आत्मसन्मान आणि स्वाभिमान


आत्मसन्मान आणि गर्व यात तस काहीही फरक नाही.फरक आहे तो अंहकार आणि आत्मसन्मान किंवा स्वाभिमान यामधे. आत्मसन्मान आणि स्वाभिमान या दोन्ही तुमच्या व्यक्तिमात्वाच्या सहज गोष्टी आहेत. तो तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही तुम्हाला ओळखल्याची ती खुण आहे.


पण अंहकार म्हणाला की तुलना आली.आत्मसन्मान आणि अभिमान यामधे तुलनेचा प्रश्नच कुठे असतो. आणि हाच मुळ फरक आहे अंहकार आणि आत्मसन्मान यात.


अहंकारात तुम्ही सतत दुसरयाशी तुलना करत राहता. तुम्ही दुसरया पेक्षा किती चांगले आहात , किती श्रेष्ठ आहात , किती उंचावर आहात , किती धार्मिक आहात , किती पवित्र आहात , हे अट्टाहासाने दाखवत दाखवत तुम्ही तुलना करत असता. तुम्ही मात्र संत आणि इतर मात्र पापी असेच तुम्ही समजता. कारण काही का असेना , तुम्ही सतत तुलना करत राहता की , तुम्ही किती वरच्या दर्जाचे आणि इतर किती खालच्या दर्जाचे? हीच ती अहंकाराची मुहूर्त मेढ !!

पण अभिमान कधीही दुसरयाशी तुलना करीत नाही. असे लोक कधीही कुणाबद्दल काही बोलत नाहीत.ते फक्त म्हणतात , " मला माझा अभिमान आहे." मी जसा आहे त्याचा मला अभिमान आहे. ते कुणा दुसरयाबद्दल बोलत नाहीत . पण ज्या क्षणी तुम्ही तुलना करू लागता तेव्हा तिथेच एक भयानक खेळाला सुरुवात होते.

पण स्वत: बद्दल अभिमानाची भावना बाळगणे यात दुसरया कोणाला कमी लेखणे होत नसते . उलट स्वत वरुन , इतराना तुम्ही अभिमान कसा बाळगावा हे दाखउ शकता.म्हणुन मी अहंकराच्या विरुद्ध आहे , आत्मसन्मान आणि स्वाभिमान यांच्या विरुद्ध नाही. हेच तर माणसाचे महत्वाचे गुण आहेत ।

(सन्दर्भ : नवी पहाट)

सोमवार, २५ मे, २००९

संपूर्ण स्वीकार!!



संपूर्ण स्वीकार!!


आहे तस पूर्णपणे स्वीकारण्याची कला तूम्ही शिका. निसर्गाची सत्यता माना त्याच्या विरुद्ध जाण्याची कल्पना ही करू नका. आता जे आहे, त्याच्या विरुद्ध जाऊनका. फ़क्त नदीच्या प्रवाह बरोबर रहा.


दोन भटके प्रवासी झाडाखाली बसले असताना एक विचारतो, "जिम तुला माहिती आहे ... हा फिरतिचा व्यवसाय आयुष्यभर करत रहाणे, इकडे तिकडे भटकने, कोणालाही आपण नको असणे, तिरस्कार यूक्त नजरा, नको नको वाटते सग़ळ......."

जिम म्हणतो, "मग तू दुसरे काम का नही बघत?"

"काय दुसरे काम, आणि काय सांगू जगाला की मी पराभूत आहे म्हणुन..."



स्वताला कधीही पराभूत समजू नका. आहे तस स्वीकारणे यात फार मोठे यश लपलेले आहे. तुम्ही पराभूत होणारच नाही. या वृत्तिमुळे जगातली कोणतीही शक्ति तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. कारण पराभवाच्या छायेत पण तुम्ही आनंदाने नाचता . येणारी प्रत्येक संधि सुंदर निर्मितीत उपयोगात आणा.

जे काही घडते ते चांगलेच आहे........असे समजुन सहज पणाने घ्या . हे सुद्धा कायम राहणार नाहीये, तर बदलत जाणार आहे.

(सन्दर्भ : नवी पहाट)

रविवार, २४ मे, २००९

ओशो


अनेक वादाना कारणीभूत ठरलेले ओशो प्रत्यक्षात अतिशय विद्वान होते.मनाची पकड़ घेणारे वक्तृत्व, भाषेवरील प्रभुत्व, विविध विषयावरील गाढा अभ्यास, मानसिक शान्ति करता ध्यानाचे विविध उपाय आणि आधुनिक विचारसारणी यांच्या जोरावर अनेक वर्षे त्यानी लोकमनावर अधिराज्य केले.
त्यांच्या काही विचारांना विरोध पण खुप झाला पण ते आपल्या मताना चिटकुन राहिले.
आजही त्यांना मानणारा मोठा जनाप्रवाह अस्तित्वात आहे.